आजची वात्रटिका
-------------------
असली नकलीचा घोळ
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये,
असली नकली चा खेळ आहे.
आम्ही असली, विरोधक नकली,
रोजच त्यांचा घोळात घोळ आहे
कुणा कुणाचा फक्त वायदा आहे,
कुणा कुणाचा फक्त फायदा आहे.
कुणा कुणाचा नेहमीचाच दावा,
आमच्या पाठीशी कायदा आहे.
दाव्यावरती प्रति दाव्याची,
गंमत मात्र भलतीच न्यारी आहे!
त्यांच्या असली नकलीपणाची,
अगदी सेम टू सेम स्टोरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8953
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20जून2025

No comments:
Post a Comment