Saturday, June 28, 2025

राजकीय भ्रम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

राजकीय भ्रम

राजकारणाचा निष्कर्ष काढणे,
गडबडीचे आणि घाईचे असते.
राजकारण कुणाचेही असले तरी,
ते आपापल्या सोयीचे असते.

कधी लवकर तर कधी उशिरा,
ज्याची त्याची ट्यूब पेटली जाते.
काळ,वेळ,स्थळ,संदर्भ बदलले की,
उलटी सुलटी भूमिका घेतली जाते.

कधी उलट तर कधी सुलट,
भूमिकांचा क्रम पक्का होत जातो !
समज गैरसमज वाढले की,
जनतेचा भ्रम पक्का होत जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8961
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28जून2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...