आजची वात्रटिका
-------------------
स्थानिक अडचणी
कुणीही कोणाला भेटू लागले,
कुणीही कुणाला खेटू लागले.
जिकडे बघावे तिकडे,
सर्वपक्षीय संमेलन वाटू लागले.
कुणाकडे काहीच नाही,
कुणा कुणाकडे मात्र हुद्दे आहेत.
ज्याला त्याला स्थानिक अडचणी,
ज्याचे त्याचे स्थानिक मुद्दे आहेत.
त्यांच्या स्थानिक अडचणीवरती,
त्यांचे उपायसुद्धा स्थानिक आहेत !
परस्परांच्या हालचाली बघून,
सगळेच्या सगळे पॅनिक आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8956
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
23जून2025

No comments:
Post a Comment