Sunday, June 29, 2025

शक्ती प्रदर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

शक्ती प्रदर्शन

भक्ती प्रदर्शनापेक्षा,
शक्ती प्रदर्शनावर जोर आहे.
ज्याला त्याला आपल्या,
अस्तित्वाचाच घोर आहे.

भक्तीच्या आडून शक्तीचे,
मोठ्या युक्तीने प्रदर्शन आहे.
तू मोठा की मी मोठा?
सुप्त असे घर्षण आहे.

भक्ती अडून शक्तीचा,
परस्परांना चेक आहे !
तरीही त्यांचाच दावा,
भक्ती आणि शक्ती एक आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8962
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
29जून2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...