आजची वात्रटिका
-------------------
अपघातांचा पंचनामा
काही ओढावून घेतले जातात,
काही जीवावर बेतले जातात.
अपघात अपघात असले तरी,
निष्पापांचे बळी घेतले जातात.
जिथे जातात निष्पापांचे बळी,
ते नक्की कुणाचे तरी पाप असते.
कुणासाठी भ्रष्टाचार वरदान,
निष्पापांसाठी मात्र ते शाप असते.
अतिउत्साह,उन्माद आणि अतिरेक,
हेसुद्धा अपघातांचे कारणं असतात !
सगळ्यांच्याच निष्काळजीपणामुळे,
स्वस्तात लोकांचे मरणं असतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8949
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16जून2025

No comments:
Post a Comment