आजची वात्रटिका
-------------------
सामाजिक विषयांनासुद्धा,
राजकीय टच दिले जातात.
आपापले राजकीय हिशोब,
त्यातून चुकते केले जातात.
कितीतरी उदाहरणे आहेत,
अगदी असेच घडलेले असते.
गाव जले हनुमान बाहर,
राजकारणाचेच पडलेले असते.
भरडणारा भरडला जातो,
पोळणाराही पोळला जातो !
सगळ्यांकडून आलटून पालटून,
पॉलिटिकल गेम खेळला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8963
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
30जून2025

No comments:
Post a Comment