Saturday, June 21, 2025

आमची भविष्यवाणी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

आमची भविष्यवाणी

कसले कसले बाबा बघा,
काहीच्या बाही वेंगाडत आहेत.
आपल्या भविष्यवाणीने,
साऱ्या दुनियेलाही तंगाडत आहेत.

जगात कधीही आणि कुठेही,
कसले तरी संकट येणारच आहे.
ज्याचा आरंभ असतो त्याचा,
शेवटही नक्की होणारच आहे.

ज्याची भविष्यवाणी गोल गोल,
त्याच्या भविष्याला बरकत आहे !
प्रत्येकाने शेवटचा दिवस म्हणून,
रोज जगायला काय हरकत आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8954
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21जून2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...