Sunday, June 22, 2025

भक्तांचे साकडे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

भक्तांचे साकडे

जशी इच्छा इकडे आहे,
तशीच इच्छा तिकडे आहे.
कुणाचे पांडुरंगाला तर,
कुणाचे विठ्ठलाला साकडे आहे.

आपापला जो उप आहे,
तो तो त्यांना मुख्य हवा आहे.
आहे तोच कायम राहील,
असाच भक्तांचा दावा आहे.

काय होईल ? काय नाही?
जो तो अंदाज लावू शकतो !
ज्याच्यावर दिल्ली मेहरबान,
त्यालाच देव पावू शकतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8955
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22जून2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...