Monday, June 16, 2025

पोरकट वल्गना...... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका

साप्ताहिक वात्रटिका 
-----------------------

पोरकट वल्गना

आघाडी आणि युतीच्या राजकारणाचे, 
हल्ली वेगवेगळे ताप वाढू लागले.
एकमेकांवरती कुरघोडी करता करता,
ते चक्क परस्परांचे बाप काढू लागले.

त्यांचे त्यांनाच नक्की ठाऊक,
कुणाची  दावेदारी किती खरी आहे?
मोठा भाऊ आणि छोटा भाऊ, 
इथपर्यंतचीच तुलना तरी बरी आहे.

अमुक तमुकच तुमचा बाप आहे,
याच्यामध्ये नेमका दर्प कसला आहे?
ही वल्गनाच अगदी पोरकट वाटते,
कुणाचा बाप ? कुठे बसला आहे ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------
साप्ताहिक सरकारनामा
14जून 2025

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...