गाय म्हणाली बैलाला,
किती रे तू चावट आहे?
खाताना जरा विचार कर
राज्यात दुष्काळाचे सावट आहे.
गरीब गाय, करील काय ?
बैल मस्तावलेले आहेत!
दुष्काळाच्या सावटाने
सारेच धास्तावलेले आहेत !!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
1 comment:
जवळपास सर्वच राजनेते कुरण खाणारे बैल आहेत ( कृपया खाय्राखुय्रा बैलानी मला माफ करावे )
Post a Comment