Wednesday, October 31, 2012
Tuesday, October 30, 2012
Monday, October 29, 2012
Sunday, October 28, 2012
Saturday, October 27, 2012
सावधान
'राष्ट्रपिता’ या पदवीवर
घटनात्मक वाद आहे.
गांधीद्वेष उजाळणे
हा जुनाच नाद आहे.
व्यक्तीद्वेषाच्या भावना
विचारपूर्वक सोडाव्या लागतील !
नाहीतर सर्वच राष्ट्र्पुरूषांच्या
पदव्या काढाव्या लागतील !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
घटनात्मक वाद आहे.
गांधीद्वेष उजाळणे
हा जुनाच नाद आहे.
व्यक्तीद्वेषाच्या भावना
विचारपूर्वक सोडाव्या लागतील !
नाहीतर सर्वच राष्ट्र्पुरूषांच्या
पदव्या काढाव्या लागतील !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Friday, October 26, 2012
माध्यमराव मनोरंजनकर
मिडीया कोणताही असो
एकाच माळेत ओवावा लागेल.
आता तर मिडीयावर
मनोरंजन कर लावावा लागेल.
प्रबोधन राहिले बाजूला
मनोरंजनावरच भर आहे !
कुणी काही बोलायला जावे तर
त्यांचीच तंगडी वर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
एकाच माळेत ओवावा लागेल.
आता तर मिडीयावर
मनोरंजन कर लावावा लागेल.
प्रबोधन राहिले बाजूला
मनोरंजनावरच भर आहे !
कुणी काही बोलायला जावे तर
त्यांचीच तंगडी वर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, October 25, 2012
Wednesday, October 24, 2012
भ्रष्ट आणि कंपनी
भ्रष्टाचारी म्हटले की,
त्यांना काय कमी आहे?
पैसे नावावर ठेवायला
त्यांच्याकडे डमी आहे.
भ्रष्टांच्या कंपन्या आहेत,
भ्रष्ट काही एकटे-दुकटे नाहीत !
नाक उचलून भ्रष्टच सांगतात,
आम्ही काही नकटे नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
त्यांना काय कमी आहे?
पैसे नावावर ठेवायला
त्यांच्याकडे डमी आहे.
भ्रष्टांच्या कंपन्या आहेत,
भ्रष्ट काही एकटे-दुकटे नाहीत !
नाक उचलून भ्रष्टच सांगतात,
आम्ही काही नकटे नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, October 23, 2012
सवयीचे गुलाम
हुजरेगिरी आणि मुजरेगिरी
एकमेकांच्या नकला आहेत.
जे सवयीचे गुलाम आहेत,
त्यांना कुठे याच्या अकला आहेत?
उरल्या-सुरल्या अकलाही
कुणाच्यातरी पायावर गहाण आहेत !
हुजर्या आणि मुजर्या
खरोखरच महान आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
एकमेकांच्या नकला आहेत.
जे सवयीचे गुलाम आहेत,
त्यांना कुठे याच्या अकला आहेत?
उरल्या-सुरल्या अकलाही
कुणाच्यातरी पायावर गहाण आहेत !
हुजर्या आणि मुजर्या
खरोखरच महान आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, October 22, 2012
निवडणूक : एक कला
ते स्वत: निवडून येतात,
त्यांना निवडून देतो कोण?
निवडणूक नावाची प्रक्रिया
नीट समजून घेतो कोण?
निवडून यायची कला
ते कोळून प्यालेले आहेत !
लोकमान्यता असो वा नसो?
ते लोकप्रतिनिधी झालेले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
त्यांना निवडून देतो कोण?
निवडणूक नावाची प्रक्रिया
नीट समजून घेतो कोण?
निवडून यायची कला
ते कोळून प्यालेले आहेत !
लोकमान्यता असो वा नसो?
ते लोकप्रतिनिधी झालेले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Sunday, October 21, 2012
खरे विजेते
जसा भ्रष्टा्चार केला जातो,
तसा तो करविला जातो.
व्यवस्थेच्या चक्रव्यूहात
प्रामाणिकपणा हरविला जातो.
काहीजण इच्छा नसताना खातात,
काहीजण मुळीच खात नाहीत !
ज्यांचा प्रामाणिकपणा हरत नाही,
ते व्यवस्थेला शरण जात नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
तसा तो करविला जातो.
व्यवस्थेच्या चक्रव्यूहात
प्रामाणिकपणा हरविला जातो.
काहीजण इच्छा नसताना खातात,
काहीजण मुळीच खात नाहीत !
ज्यांचा प्रामाणिकपणा हरत नाही,
ते व्यवस्थेला शरण जात नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Saturday, October 20, 2012
Friday, October 19, 2012
नकट्यांची युती
हेही नकटे आहेत,
तेही नकटे आहेत.
नकट्यांची झाली युती
नाकेले मात्र एकटे आहेत.
परस्परांच्या पापावर
सरळ सरळ झाकण आहे !
नकट्यांकडून नकट्यांची
जाहिर पाठराखण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
तेही नकटे आहेत.
नकट्यांची झाली युती
नाकेले मात्र एकटे आहेत.
परस्परांच्या पापावर
सरळ सरळ झाकण आहे !
नकट्यांकडून नकट्यांची
जाहिर पाठराखण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Thursday, October 18, 2012
Wednesday, October 17, 2012
दुसर्या लग्नाची गोष्ट
नट-नट्यांचे लग्न
ही गोष्टच मनोरंजक असते.
डोळ्यासमोर ज्या उभ्या राहतात
त्या प्रतिमांची ती भंजक असते.
नट-नट्यांच्या पाठीशी
लग्नाचा अनुभव दांडगा असतो !
लग्नाची भूक काही भागत नाही
नटी हांडगी,नट हांडगा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
ही गोष्टच मनोरंजक असते.
डोळ्यासमोर ज्या उभ्या राहतात
त्या प्रतिमांची ती भंजक असते.
नट-नट्यांच्या पाठीशी
लग्नाचा अनुभव दांडगा असतो !
लग्नाची भूक काही भागत नाही
नटी हांडगी,नट हांडगा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, October 16, 2012
हे दुर्गामाते.....
आजची वात्रटिका
------------------------हे दुर्गामाते.....
तुझी स्थापणा केली कुठे?
मात्र तू बसतेस कुठे?
एवढे राक्षस माजले असताना
नेमकी तू असतेस कुठे?
आजकाल तुझ्या’भ्रूण’रूपाला
कुणी जिवंत ठेवत नाही.
त्या गर्भासूरांचे रक्त पिण्यासाठी
तुझी जीभ कशी लवलवत नाही?
सबलाही अबला होतात,
हेही तूला लक्षात ठेवावे लागेल !
उशिर व्हायच्या अगोदर
तुलाच मदतीला धावावे लागेल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मात्र तू बसतेस कुठे?
एवढे राक्षस माजले असताना
नेमकी तू असतेस कुठे?
आजकाल तुझ्या’भ्रूण’रूपाला
कुणी जिवंत ठेवत नाही.
त्या गर्भासूरांचे रक्त पिण्यासाठी
तुझी जीभ कशी लवलवत नाही?
सबलाही अबला होतात,
हेही तूला लक्षात ठेवावे लागेल !
उशिर व्हायच्या अगोदर
तुलाच मदतीला धावावे लागेल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
--------------
फेरफटका-4600
दैनिक झुंजार नेता
16ऑक्टोबर 2012
Monday, October 15, 2012
स्फोटास कारण की....
आरोपांचे साखळी बॉम्ब
एकामागे एक फुटत आहेत.
आरोप खरे असो वा खोटे,
आरोप खरे वाटत आहेत.
या घोटाळ्याचे,त्या घोटाळ्याशी
एक अदृश्य साखळी आहे !
स्फोटांमागे स्फोट होण्यास कारण की,
विश्वासाचीच पोकळी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
एकामागे एक फुटत आहेत.
आरोप खरे असो वा खोटे,
आरोप खरे वाटत आहेत.
या घोटाळ्याचे,त्या घोटाळ्याशी
एक अदृश्य साखळी आहे !
स्फोटांमागे स्फोट होण्यास कारण की,
विश्वासाचीच पोकळी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Sunday, October 14, 2012
पद आणि प्रतिष्ठा
कार्यकर्त्यांना उल्लू बनवायचे
प्रकार किती साधे असतात.
कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी
पक्षात पदेच पदे असतात.
कार्यकर्त्यांना नादी लावित
पदाची माळ गळ्यात असते !
पदाची प्रतिष्ठा मात्र
मिरचीच्या खळ्यात असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
प्रकार किती साधे असतात.
कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी
पक्षात पदेच पदे असतात.
कार्यकर्त्यांना नादी लावित
पदाची माळ गळ्यात असते !
पदाची प्रतिष्ठा मात्र
मिरचीच्या खळ्यात असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Saturday, October 13, 2012
घोटाळ्यांचे नोबेल
प्रत्येक भारतीयाला वाटते
नोबेल भारतात यायला हवे.
त्यासाठी तरी घोटाळेबहाद्दरांना
नोबेल पारितोषिक द्यायला हवे.
घोटांळ्यामुळे तरी आपली जागा
नोबेलमध्ये पक्की होईल !
दरवर्षी घोटाळ्यांचे नोबेल
भारतामध्ये नक्की येईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
नोबेल भारतात यायला हवे.
त्यासाठी तरी घोटाळेबहाद्दरांना
नोबेल पारितोषिक द्यायला हवे.
घोटांळ्यामुळे तरी आपली जागा
नोबेलमध्ये पक्की होईल !
दरवर्षी घोटाळ्यांचे नोबेल
भारतामध्ये नक्की येईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Friday, October 12, 2012
Thursday, October 11, 2012
Wednesday, October 10, 2012
जावयाचा आहेर
आपण म्हणजे ’मॅंगो’पिपल
देश म्हणजे बनाना ’रिपब्लिक’ आहे.
टिकेवरती प्रतिटिका झाली
इथपर्यंतच ठीक आहे.
जे जावयाच्या पोटात होते
तेच फेसबुकवरून बाहेर आहे !
हा जावयाच सासूबाईला
अगदी शेलका आहेर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
देश म्हणजे बनाना ’रिपब्लिक’ आहे.
टिकेवरती प्रतिटिका झाली
इथपर्यंतच ठीक आहे.
जे जावयाच्या पोटात होते
तेच फेसबुकवरून बाहेर आहे !
हा जावयाच सासूबाईला
अगदी शेलका आहेर आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, October 9, 2012
खरी ओळख
तुम्हांला जेंव्हा कधी
बिनव्याजी कर्ज मिळू शकते.
तेंव्हा तुम्ही कुणाचे जावई आहात
ते सार्या देशाला कळू शकते.
हा काही कुणा एकट्याचा
फार मोठा जावई शोध नाही!
तुम्ही ’आम आदमी’ नाहीत
याचा तुम्हांलाच कसा बोध नाही?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
बिनव्याजी कर्ज मिळू शकते.
तेंव्हा तुम्ही कुणाचे जावई आहात
ते सार्या देशाला कळू शकते.
हा काही कुणा एकट्याचा
फार मोठा जावई शोध नाही!
तुम्ही ’आम आदमी’ नाहीत
याचा तुम्हांलाच कसा बोध नाही?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
भावात्मक विचार
गॅस वाढू लागला,
तसे रॉकेल वाढते आहे.
काळ्या बाजाराला विचारा,
कसे लीटर पडते आहे ?
उघड्याला नागड्याचा
अगदी पक्का शेजार आहे !
शेगडीवाल ’गॅस’ वर तर
स्टोव्हवाला बेजार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
तसे रॉकेल वाढते आहे.
काळ्या बाजाराला विचारा,
कसे लीटर पडते आहे ?
उघड्याला नागड्याचा
अगदी पक्का शेजार आहे !
शेगडीवाल ’गॅस’ वर तर
स्टोव्हवाला बेजार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, October 8, 2012
Sunday, October 7, 2012
Saturday, October 6, 2012
केजरीवाल बॉम्ब
आयजीच्या जीवावरती
बायजी उदार झाला.
सासूच्या राज्यात म्हणे
जावई सुभेदार झाला.
आरोपांची उडाली राळ,
त्याची वास्तवाशी नाळ आहे !
येणारा काळच सांगेल,
हे तथ्य की आळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
बायजी उदार झाला.
सासूच्या राज्यात म्हणे
जावई सुभेदार झाला.
आरोपांची उडाली राळ,
त्याची वास्तवाशी नाळ आहे !
येणारा काळच सांगेल,
हे तथ्य की आळ आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Friday, October 5, 2012
थापालॉजी
आश्वासनांवर आश्वासने
हीच आजची निती आहे.
थापाड्यांची आणि गप्पाड्यांची
आज राजकीय युती आहे.
थापा किती माराव्यात ?
यालाही काही माप नाही !
थापाड्या-गप्पाड्यांचीच चलती आहे
ही काही थाप नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
हीच आजची निती आहे.
थापाड्यांची आणि गप्पाड्यांची
आज राजकीय युती आहे.
थापा किती माराव्यात ?
यालाही काही माप नाही !
थापाड्या-गप्पाड्यांचीच चलती आहे
ही काही थाप नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Thursday, October 4, 2012
जयस्वालांचा ’स्त्री’प्रकाश
जयस्वालांनी ’स्त्री’प्रकाश टाकला,
बायको जुनी होत असते.
खरे तर आपण जुने झालो की,
ही शंका मनी येत असते.
बायकोला नवी-जुनी म्हणण्यात
कोणताही पुरूषार्थ नसतो !
मजे-मजेत बरळण्याला
तसा कोणताही अर्थ नसतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
बायको जुनी होत असते.
खरे तर आपण जुने झालो की,
ही शंका मनी येत असते.
बायकोला नवी-जुनी म्हणण्यात
कोणताही पुरूषार्थ नसतो !
मजे-मजेत बरळण्याला
तसा कोणताही अर्थ नसतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, October 3, 2012
टोपीवरचे नामांतर
कुणाचा चेहरा आशादायी,
कुणाचा चेहरा छद्मी आहे.
अण्णांच्या जाग्यावरती
आता ’आम आदमी’ आहे.
मार्ग वेगळा,उद्दीष्ट एक,
जरी टीम अण्णात दुही आहे !
चुकांमधून शिकत असल्याची
टीम अण्णाची ग्वाही आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
कुणाचा चेहरा छद्मी आहे.
अण्णांच्या जाग्यावरती
आता ’आम आदमी’ आहे.
मार्ग वेगळा,उद्दीष्ट एक,
जरी टीम अण्णात दुही आहे !
चुकांमधून शिकत असल्याची
टीम अण्णाची ग्वाही आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Tuesday, October 2, 2012
जाहिरातींचा बिनडोकपणा
जाहिरात म्हटले की,
त्यात बाई लागते.
डोके कुणाचेही असो
त्याला चाई लागते.
डोक्यापेक्षा डोळ्यांचेच
जाहिरातीत काम असते !
जाहिरातींचा अर्थ लावताना
डोके मात्र जाम असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
त्यात बाई लागते.
डोके कुणाचेही असो
त्याला चाई लागते.
डोक्यापेक्षा डोळ्यांचेच
जाहिरातीत काम असते !
जाहिरातींचा अर्थ लावताना
डोके मात्र जाम असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
Monday, October 1, 2012
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...