Showing posts with label एक दोन तीन चार... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label एक दोन तीन चार... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, March 11, 2022

एक दोन तीन चार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

एक दोन तीन चार...

जुनीच शंका आणि प्रश्नाचे,
उत्तर प्रदेशात मिळाले गेले
हत्ती गेला,शेपूट राहिले,
काँग्रेसलासुद्धा कळाले गेले

आपला हात मोडून,
आपल्याच गळ्यात पडला आहे
दिल्लीनंतर पंजाबही,
आपने झाडून काढला आहे

उत्तरात काही खंड नाही,
पाठीशी जनतेचा दुवा आहे!
डबल इंजिनाच्या स्वागताला,
पुन्हा एकदा गोवा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6434
दैनिक पुण्यनगरी
11मार्च 2022
 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...