आजची वात्रटिका
-----------------------
गौप्यस्फोटाचे परिणाम
कुठे वावड्यावर वावड्या आहेत,
कुठे स्फोटावर स्फोट आहेत.
ज्यांच्या वावड्या आणि स्फोट,
त्यांचेच दात,त्यांचेच ओठ आहेत.
कुणाची काढून घेतली हवा,
कुणी कुणी भलतेच जोशात आहेत.
ज्यांची बसली दातखिळी,
त्यांचे दात,त्यांच्याच घशात आहेत.
कुणी देतोय टाळीवर टाळी,
कुणाच्या तोंडाला टाळे बसले आहे !
राजकीय सभ्यतेला म्हणे,
कुणी कुणी उघड काळे फासले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6721
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
16फेब्रुवारी2023
Showing posts with label गौप्यस्फोटाचे परिणाम.....मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label गौप्यस्फोटाचे परिणाम.....मराठी वात्रटिका. Show all posts
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...
