आजची वात्रटिका
------------------------
दृष्टीदोष
तुमचे जसे पटू शकत नाही,
तसे त्यांचेही पटू शकत नाही.
मग त्यांनी केलेले पक्षांतर,
घटस्फोट का वाटू शकत नाही?
जसे तुमचे तीन तेरा वाजतात,
त्यांचीही तीन तेरा वाजले जातात!
संसारिक घटस्फोटापेक्षा,
राजकीय घटस्फोट गाजले जातात! !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6426
दैनिक पुण्यनगरी
4मार्च 2022