Showing posts with label भेकडांचे आयुष्य.... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label भेकडांचे आयुष्य.... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, October 7, 2022

भेकडांचे आयुष्य.... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

---------------------------

भेकडांचे आयुष्य

खोट्याचा आधार घेऊन,
बिनधास्त जगतात लोक इथे.
चक्क भिकाऱ्याला भिक,
बिनधास्त मागतात लोक इथे.

ज्यांचे बुडणे ठरलेले,
त्यांना काडीचा आधार वाटतो.
रोखठोकची भाषा जरी,
त्यांचा हिशोब उधार वाटतो.

उधारी पाधारीवरच,
त्यांचे आयुष्य बेतलेले असते !
निरस जगणे मरणे त्यांचे,
त्यांनीच पाणी घातलेले असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8067
दैनिक झुंजार नेता
7ऑक्टोबर2022

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...