आजची वात्रटिका
------------------------
मिशन वेट लॉस
आपल्या हाताने आपले,
वजन घटवायला लागले.
कमी वजनाचे महत्व,
लोकांना पटवायला लागले.
ज्याचे वजन वाढले नाही,
त्यालाही वाढल्याचा भास आहे!
हल्ली जिकडे बघावे तिकडे,
मिशन वेट लॉस आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6435
दैनिक पुण्यनगरी
12मार्च 2022