Showing posts with label विकास दर्शन... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label विकास दर्शन... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, December 16, 2022

विकास दर्शन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

विकास दर्शन

सीमेच्या पलीकडे,
जोरदार विकास आहे.
सीमेच्या अलीकडे,
सगळेच भकास आहे.

सीमार्तीय जनतेचे,
हे धोरण झकास आहे.
त्यांच्या डोक्यात,
जणू नवा प्रकाश आहे.

सीमेच्या अलीकडच्यांना,
सीमेपलीकडची हाव आहे!
सीमाप्रश्न पेटविण्याचा,
घरभेद्यांमार्फत डाव आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8124
दैनिक झुंजार नेता
16डिसेंबर2022

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...