Showing posts with label सर्जा म्हणाला राजाला..मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label सर्जा म्हणाला राजाला..मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, December 17, 2021

सर्जा म्हणाला राजाला..मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सर्जा म्हणाला राजाला

आपली अवस्थासुद्धा,
अगदी रेसच्या घोड्यासारखी आहे.
घोड्यांची रेस म्हणजे,
आपल्या बैलगाड्यासारखी आहे.

कोर्टाचीही खात्री पटली,
आपण घोड्यासारखे धावू शकतो.
आपण फक्त मान डोलवायची,
आपण कुठे घोडे लावू शकतो?

बैलासारखे बैल असूनही,
आपल्या गरीब गाया आहेत!
बैलगाड्याला जुंपवणारेच,
आपले बाप आणि आया आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7790
दैनिक झुंजार नेता
17डिसेंबर2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...