Tuesday, November 12, 2019

मत मतांतर

आजची वात्रटिका
-----------------------------------------
मत - मतांतर
महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष,
पुन्हा पुन्हा गोता खात आहे.
मतदारांनाही कळेना,
आपले मत कुठून कुठे जात आहे?
कालच्या मत - भेदाचे,
आज मत - मतांतर आहे !
यांना दिले काय?
त्यांना दिले काय ?
यात आता कुठे अंतर आहे ?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5623
दैनिक पुण्यनगरी
12नोव्हेंबर2019

आचार संहितेची श्रध्दांजली


Monday, November 11, 2019

जनतेचा आवाज


रनिंग कॉमेन्ट्री

आजची वात्रटिका
--------------------------------------
रनिंग कॉमेन्ट्री
सत्तेच्या रिंगणाबाहेरचे,
रिंगणाच्या आत आले.
कालपर्यंत ' हात ' चोळणारे,
मनाचे मांडे खात आले.
तीन तिघाडे,काम बिघाडे,
मराठी माणसाला ज्ञात आहे.
विरोधी बाकावर बसण्याची,
यंदा नवीनच साथ आहे.
चाव्या मारून उपयोग नाही,
घड्याळाचीही टिक टिक आहे !
ब्रेकींग न्यूजचे मात्र,
जिकडे तिकडे पिकच पीक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5622
दैनिक पुण्यनगरी
11नोव्हेंबर2019

Sunday, November 10, 2019

वॉल्मिकी रामायण

आजची वात्रटिका
--------------------------------------
वॉल्मिकी रामायण
फेसबुकच्या ' वॉल ' वर
प्रत्येकाने नियंत्रण ठेवले होते.
प्रत्येक ग्रुपच्या अॅडमिनने,
आपले कवाड लावले होते.
सोशल मीडियावर असे
' वॉल ' मिकी रामायण रंगले होते !
रंगाचा बेरंग होवू नये यासाठी,
जीव टांगणीला टांगले होते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7117
दैनिक झुंजार नेता
10नोव्हेंबर2019

विषारी डंख

आजची वात्रटिका
--------------------------------------
विषारी डंख
खपलीखालच्या जखमा,
कशा म्हणाव्या ओल्या नाहीत?
गावोगावी शाळांमध्ये,
पोरांना बसायला खोल्या नाहीत.
गल्लोगल्ली मद्यालये हाऊसफुल्ल,
रुग्णालयांच्या नावाने शंख आहेत !
विद्यालयांपेक्षा देवालयांना प्राधान्य,
नव्याने पुन्हा जुनेच डंख आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5621
दैनिक पुण्यनगरी
10नोव्हेंबर2019

Friday, November 8, 2019

महाराष्ट्राची वाटचाल

आजची वात्रटिका
--------------------------------------
महाराष्ट्राची वाटचाल
विश्वास आणि नैतिकतेची
सगळी लज्जत गेली आहे.
सगळ्याच भविष्यवाल्यांची
पुरती इज्जत गेली आहे.
चॅनलला बाईट देवून देवून
एकेकाचे तोंड सुजले आहे.
राजकीय विश्लेषकांचेही
पार टमरेल वाजले आहे.
ज्याला त्याला वाटतेय,
फक्त आपलीच लाल आहे !
महाराष्ट्र विधानसभेची
राष्ट्रतीपदाकडे वाटचाल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7115
दैनिक झुंजार नेता
8नोव्हेंबर2019
------------------------------------------

रेड अलर्ट

आजची वात्रटिका
--------------------------------------
रेड अलर्ट
एक गोष्ट आम्हांला
पुराव्यानिशी पटली आहे.
कुत्र्यांना कुठे कळते?
लाल रंगाची बाटली आहे?
अंधश्रद्धा नष्ट करण्याचा
जणू कुत्र्यांचा चंग आहे !
त्याच्यावरच टांग वर करतात,
ज्यात नेमका लाल रंग आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5619
दैनिक पुण्यनगरी
8नोव्हेंबर2019

Thursday, November 7, 2019

आमचे ' मार्ग ' दर्शन

आजची वात्रटिका
--------------------------------------
आमचे ' मार्ग ' दर्शन
जसे आहेराचे कपडे बांधले की,
त्याचा बस्ता तयार होतो.
तसे खड्ड्याला खड्डे जोडले की,
त्याचा रस्ता तयार होतो
जी खड्ड्यांना खड्डे जोडते,
तिचे नावच नाली आहे !
खड्डे दिसत नाहीत त्या रस्त्यांची,
थेट गटारगंगा झाली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7114
दैनिक झुंजार नेता
7नोव्हेंबर2019

हेल्मेट सक्तीचा धडा

आजची वात्रटिका
--------------------------------------
हेल्मेट सक्तीचा धडा
रस्त्यांवर खड्डे पडतात,
कारण रस्त्यांचा खाऊ केला जातो.
हेल्मेटची सक्ती केली तर,
त्याचाही खूपच बाऊ केला जातो.
आपली काळजी घेणाऱ्यांना,
आणि न घेणाऱ्यांना सुद्धा,
आपला उगीचच विरोध आहे !
हेल्मेट सक्ती वरून तरी,
सर्वांनी धडा घ्यावा असा बोध आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5618
दैनिक पुण्यनगरी
7नोव्हेंबर2019

Wednesday, November 6, 2019

काळजीस कारण की

आजची वात्रटिका
--------------------------------------
काळजीस कारण की,
एकमेकांच्या सहनशीलतेचा
जास्तच अंत पाहू लागले.
नव्या सरकारने सोडून,
जुनेच काळजी वाहू लागले.
काळजी निर्माण करणारेच,
राज्याची काळजी वाहत आहेत !
स्वतः बरोबर इतरांचीही,
निकालानंतर परीक्षा पाहत आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5617
दैनिक पुण्यनगरी
6नोव्हेंबर2019

नंबर गेम

आजची वात्रटिका
--------------------------------------
नंबर गेम
सर्वांचेच संख्याबळ
अगदी जेमतेम आहे.
सत्तास्थापना म्हणजे
पक्का 'नंबर गेम' आहे.
नंबर गेम म्हणजे
आकड्यांचा तिढा असतो !
जो सगळीकडेच वळवळतो,
तो सत्तेचा किडा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7113
दैनिक झुंजार नेता
6नोव्हेंबर2019

Monday, November 4, 2019

पोरखेळ



आजची वात्रटिका
--------------------------------------
पोरखेळ
दैव देते, कर्म नेते,
असेच काहीसे लक्षण आहे.
महाराष्ट्राची राजकीय अवस्था,
खरोखर खूप विलक्षण आहे.
कुणाची दोस्ती,कुणाची मस्ती,
अशीच काहीशी वेळ आहे !
नातावांकडे बघत आजोबा म्हणाले,
हा तर निव्वळ ' पोरखेळ ' आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7111
दैनिक झुंजार नेता
4नोव्हेंबर2019
----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
उर्वरीत
https://suryakantdolase.blogspot.in
-------------------------
#आजच्या_वात्रटिका-#सूर्यकांत_डोळसे

संजय उवाच

आजची वात्रटिका
--------------------------------------
संजय उवाच
राऊत दामटतात घोडे,
त्याचा अर्थ रोखठोक हाच आहे.
उद्धव झाला अर्जुन,
सगळे काही ' संजय उवाच ' आहे.
अग्रलेख उग्रलेख वाटावेत,
असा एक एक टोमणा आहे !
तहाचे पर्याय समोर ठेवूनच,
प्राप्त परिस्थितीचा ' सामना ' आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5615
दैनिक पुण्यनगरी
4नोव्हेंबर2019

Sunday, November 3, 2019

व्हॉट्स ऍप ?

आजची वात्रटिका
--------------------------------------
व्हॉट्स ऍप ?
कुणाचा येतोय टेलिग्राम,
कुणी ट्विटायला लागले.
जे वास्तव असावे,
ते आभासी वाटायला लागले.
नको त्याचा चव्हाटा,
हवे ते मात्र झाकून आहे !
ऑफलाईन कारभाराला
ऑनलाईन चा अपशकून आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5614
दैनिक पुण्यनगरी
3नोव्हेंबर2019

Saturday, November 2, 2019

कारभारी दमानं

आजची वात्रटिका
--------------------------------------
कारभारी दमानं
मुख्यमंत्री असो वा नसो,
राज्यकारभार अडत नाही.
खुर्चीवर कुणीही बसला काय?
सामान्यांना फरक पडत नाही.
नेहमीप्रमाणे निवडणुकीनंतर
सत्तेसाठी शीतयुद्ध आहे !
कारभाऱ्याशिवाय कारभार,
हे पुन्हा पुन्हा सिद्ध आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5613
दैनिक पुण्यनगरी
2नोव्हेंबर2019
-------------------------------------------

Friday, November 1, 2019

दिवाळी बोनस

आजची वात्रटिका
--------------------------------------
दिवाळी बोनस
बायका माहेरी जाताच,
दिवाळीनंतर दिवाळी असते.
ह्या दिवाळीच्या आनंदाची,
चवही हिवाळी असते.
दिवाळीचा आनंद लुटायला,
नवरे मात्र धोरणी लागतात !
घरा- घरातले शेव आणि चिवडे,
चकणा म्हणून कारणी लागतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7109
दैनिक झुंजार नेता
1 नोव्हेंबर2019

अपक्षांचे लॉजिक

आजची वात्रटिका
--------------------------------------
अपक्षांचे लॉजिक
तुम्ही निःपक्ष,
आम्हीही निःपक्ष.
एकमेकांची बाजू घेत,
बोलले अपक्ष.
अपक्ष म्हणून आपले,
नाव बदनाम आहे.
लोकशाही वाचविणे,
आपले राष्ट्रीय काम आहे.
वा रे अपक्ष,
काय त्यांचे लॉजिक आहे ?
त्यांच्या फिगर मध्येच,
त्यांचे खरे मॅजिक आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5612
दैनिक पुण्यनगरी
1 नोव्हेंबर2019

महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...