Thursday, May 22, 2025
वेड्यांचा बाजार...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
वेड्यांचा बाजार
आपले खाजगी आयुष्य सुद्धा,
रात्रंदिवस व्हायरल व्हायला लागले.
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी,
नको त्या थराला जायला लागले.
काय दाखवावे? काय नाही?
याचा सारासार विवेक राहिला नाही.
इन्स्टा आणि फेसबुक सारखा तमाशा,
प्रत्यक्ष कनातीतही पाहिला नाही.
पैसा आणि प्रसिद्धीच्या नशेमुळे,
आयतेच लावलेल्या जाळ्यात आहेत !
जणू दाखवणारापेक्षा बघणारेच,
सोशल मीडियावर खुळ्यात आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8924
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
22मे 2025
Wednesday, May 21, 2025
दैनिक वात्रटिका l 21मे2025वर्ष- चौथेअंक - 351वा l पाने -58
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
.
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 21मे2025
वर्ष- चौथे
अंक - 351वा l पाने -58
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/181lTBfk587P-DaEtDnvIZHAMWcgQFlY5/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 64
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात लिहिलेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..
5) वात्रटिका संग्रह परिचय
6) बाल वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
नेतृत्वाची ओळख....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
नेतृत्वाची ओळख
जात,धर्म आणि प्रवर्गानुसार
राजकारणी ओळखले जाऊ लागले.
सर्व समावेशक नेतृत्वाचे,
खोटे चेहरे खळकले जाऊ लागले.
जात,धर्म आणि प्रवर्गाच्या,
ओळखीचीही राजकीय नशा आहे.
नेतृत्वाच्या संकुचित ओळखीला,
सर्वत्र बेंडबाजा आणि ताशा आहे.
जात,धर्म आणि प्रवर्गातच,
कुणीही जखडून जाऊ नका !
सर्वव्यापी व्हा;सर्वसमावेशक व्हा,
छोटेपणातच आखडून जाऊ नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8923
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21मे 2025
Tuesday, May 20, 2025
दैनिक वात्रटिका l 20मे2025वर्ष- चौथेअंक - 350वा l पाने -57
पक्षांतराचे चक्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
------------------
पक्षांतराचे चक्र
कुणाची टवकारते नजर,
कुणाची नजर वक्र असते.
जे कधीच थांबत नाही,
ते पक्षांतराचे चक्र असते.
जशी पक्षांतराची दिशा,
वादग्रस्त ठरू शकते.
तसे पक्षांतराचे चक्रही,
उलटे सुलटे फिरू शकते.
नाही नाही म्हणणाराचेही,
नकळत पक्षांतर होत असते !
पक्षांतराच्या चक्राला,
नेहमी सत्ताच गती देत असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-8922
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20मे 2025
Monday, May 19, 2025
दैनिक वात्रटिका l 19मे2025वर्ष- चौथेअंक - 349वा l पाने -57
बॅट म्हणाली बॉलला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
बॅट म्हणाली बॉलला
त्यांनी केली शस्त्रसंधी,
मी पुन्हा नव्याने सिद्ध आहे.
आयपीएलच्या नावाखाली,
पुन्हा तुझे माझे युद्ध आहे
बॅट्समनपेक्षा तुला मला,
चॅनलवाल्यांनी ठोकले आहे.
क्रिकेटसारख्या क्रिकेटचे,
त्यांनी युद्ध करून टाकले आहे.
कुणी म्हणतोय शस्त्र संधी,
कुणासाठी युद्धविराम आहे !
आपल्याला दहशतवाद्यांच्या कृपेने,
भारत पाकमध्ये आराम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8921
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19मे 2025
Sunday, May 18, 2025
दैनिक वात्रटिका l 18मे2025वर्ष- चौथेअंक - 348वा l पाने -54
वाचाल तर वाचाल..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
वाचाल तर वाचाल..
कुणी म्हणाले, नरकात स्वर्ग आहे.
कुणी म्हणाले,स्वर्गात नरक आहे.
यात खरे आणि खोटे काहीच नाही,
हा राजकीय दृष्टिकोनाचा फरक आहे.
ज्याला जसे लिहायचे आहे,
तसे तो अगदी खुशाल लिहू शकतो.
एखाद्याची समीक्षा करताना,
कुणी बाल साहित्य म्हणून पाहू शकतो.
ज्याला जसे नाचायचे आहे,
ते तसे खुशाल नाचू शकतात !
ज्याला विरोधक म्हणून बसायचे आहे,
तेच नरकातला स्वर्ग वाचू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8920
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18मे 2025
Saturday, May 17, 2025
दैनिक वात्रटिका l 17मे2025वर्ष- चौथेअंक - 347वा l पाने -54
गौप्यस्फोटांचा बार....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
गौप्यस्फोटांचा बार
जेवढे जेवढे आभाळ हाणता येईल,
तेवढे तेवढे आभाळ हाणले जाते.
दडवून ठेवलेल्या सत्यालाच,
राजकारणात गौप्यस्फोट मानले जाते.
ज्याच्या त्याच्या राजकीय स्वार्थापोटी,
नेहमी सत्याच्या नरडीचा घोट असतो.
तुझे माझे पटेना असे झाले की,
त्यांच्याकडून राजकीय गौप्यस्फोट असतो.
वैयक्तिक स्वार्थापोटी सामाजिक न्याय,
नेहमी पायदळी तुडवला जातो !
ज्याच्या त्याच्या राजकीय सोयीनुसार,
गौप्य स्फोटांचा बार उडवला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8919
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17मे 2025
Friday, May 16, 2025
दैनिक वात्रटिका l 16मे2025वर्ष- चौथेअंक - 346वा l पाने -54
कर्म धर्म संयोगची जातकुळी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
कर्म धर्म संयोगची जातकुळी
तुमची इच्छा असो वा नसो,
तुम्हाला जाती-धर्माशी जोडले जाते.
जाती धर्माच्या चौकटीमध्ये,
तुम्हाला जबरदस्तीने ओढले जाते.
जाती आणि धर्माच्या कल्पना,
वेडगळ आणि भाबड्या आहेत.
अनेकांच्या यशाचे रहस्य,
जाती आणि धर्माच्या कुबड्या आहेत.
दुसऱ्याने जाती धर्म काढला की,
आपल्याला नको तेवढा राग असतो !
जाती धर्माचा हा कर्म धर्म संयोग,
म्हणूनच तर समजून घेणे भाग असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8918
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16मे 2025
Thursday, May 15, 2025
दैनिक वात्रटिका l 15मे2025वर्ष- चौथेअंक - 345 वा l पाने -54
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 15मे2025
वर्ष- चौथे
अंक - 345 वा l पाने -54
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/139rN2Dng2S6q1x68AwexsZtpx45YH6y4/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 58
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 20+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..
5) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
विना सहकार नाही उद्धार ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
विना सहकार नाही उद्धार
यांच्या मांडीला त्यांची मांडी आहे,
त्यांच्या मांडीला यांची मांडी आहे.
वाढत्या राजकीय गुंडागर्दीची,
नेमकी अशीच तर गुंडी आहे.
वाढत्या राजकीय गुंडागर्दीला,
वाढती राजकीय पाठराखण आहे.
गुंडागर्दी आणि राजकारणाचे,
परस्परांना राजरोस टेकण आहे.
विना सहकार नाही उद्धार,
हाच यातला आशय आहे !
कुणाची कुणामुळे बदनामी होते ?
हा मात्र संशोधनाचा विषय आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8917
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15मे 2025
Wednesday, May 14, 2025
दैनिक वात्रटिका l 14मे2025वर्ष- चौथेअंक - 344 वा l पाने -54
युद्धकालीन सत्य ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
युद्धकालीन सत्य
कोण खरे?कोण खोटे?
युद्धकाळात काही कळत नाही.
अफवा आणि वावड्यांशिवाय,
कानावर काही आदळत नाही.
कधी खरेही खोटे वाटू लागते,
कधी खोटेही खरे वाटू लागते.
पहिल्या अफवा जिरेपर्यंत,
नव्या अफवांना तोंड फुटू लागते.
कळत नाही कुणाची नियत खराब?
कुणाची नियत साफ असते ?
प्रेमात आणि युद्धात,
म्हणूनच तर सगळे माफ असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8916
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14मे 2025
Tuesday, May 13, 2025
दैनिक वात्रटिका l 13मे2025वर्ष- चौथेअंक - 342आणि 343वा l पाने -63
युद्धानुभव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
युद्धानुभव
ब्लॅक आउट, मॉक ड्रील,सायरन,
या शब्दांनी धुमाकूळ घातला आहे
तमाम भारतीयांनी युद्धाचा अनुभव,
याची देही याची डोळा घेतला आहे.
क्षेपणास्त्र, सुदर्शनचक्र, शस्त्रसंधी,
याचीही शब्द संग्रहात भर आहे.
अमेरिकेच्या ट्रम्प तात्याची तर,
गल्लीबोळातूनसुद्धा टर आहे.
ज्यांना बोलायला संधी मिळाली,
ते तर नाकाने कांदे सोलीत आहेत !
अजूनही लोकांच्या डोक्यावर,
ड्रोनच ड्रोन घिरट्या घालीत आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका-8915
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13मे 2025
Monday, May 12, 2025
अमेरिकेची शिष्टाई,,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
अमेरिकेची शिष्टाई
दोघांच्या भांडणांमध्ये
तिसऱ्याचाच रुबाब आहे.
कबाब मे हड्डी नाही,
जणू हड्डीतच कबाब आहे.
जणू बोक्यांच्या भांडणामध्ये,
माकडाने संधी साधली आहे.
ज्यांची मागणीच नव्हती,
त्यांच्यावर शस्त्रसंधी लादली आहे
अमेरिकेच्या शिष्टाईत,
भारताच्या संयमाची माती आहे !
जणू नव्याने शोध लागला
जगाला अणुबॉम्बची भीती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8914
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12मे 2025
Sunday, May 11, 2025
दैनिक वात्रटिका l 11 मे2025वर्ष- चौथेअंक - 3401 वा l पाने -51
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 11 मे2025
वर्ष- चौथे
अंक - 3401 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1xYQnsUdRaYQkK5GY9_s1I49PjacJmTvw/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 55
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या 25+ सदाबहार
वात्रटिका
4) वाचकांचे अभिप्राय..
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#युद्धविराम
#india #pakistan #Ceasefire #SJaishankar #IndianArmy
युद्ध विराम आणि शस्त्रसंधी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
युद्ध विराम आणि शस्त्रसंधी
सुरु होण्याआधीच संपली कहानी,
अशी युद्ध विरामाची तऱ्हा आहे.
अमेरिकेला कुणीतरी सांगा,
पाकवर विश्वास न ठेवलेला बरा आहे.
शस्त्रांबरोबर बुद्धीने खेळला जातो,
असा युद्धाचा दुहेरी खेळ आहे.
युद्धविराम घेतो पण अटी आवरा,
अशीच पाकिस्तानवरती वेळ आहे.
युद्धविराम असो की शस्त्रसंधी ?
पाकिस्तान आपल्याच तालात आहे !
साऱ्या जगाला कळून चुकले,
बुडत्याचा पाय जास्तच खोलात आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8913
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11 मे 2025
लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...




















