Thursday, May 15, 2025

विना सहकार नाही उद्धार ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

विना सहकार नाही उद्धार

यांच्या मांडीला त्यांची मांडी आहे,
त्यांच्या मांडीला यांची मांडी आहे.
वाढत्या राजकीय गुंडागर्दीची,
नेमकी अशीच तर गुंडी आहे.

वाढत्या राजकीय गुंडागर्दीला,
वाढती राजकीय पाठराखण आहे.
गुंडागर्दी आणि राजकारणाचे,
परस्परांना राजरोस टेकण आहे.

विना सहकार नाही उद्धार,
हाच यातला आशय आहे !
कुणाची कुणामुळे बदनामी होते ?
हा मात्र संशोधनाचा विषय आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8917
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
15मे 2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...