Wednesday, May 28, 2025

हंगामी विरोधक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

हंगामी विरोधक

सत्तेवर कधीही कुणीही असले तरी,
पाऊस त्यांचे पितळ उघडे करतो.
एकमेकांची कितीही झाकली तरी,
पाऊस त्यांना अलगद नागडे करतो.

भ्रष्टाचाऱ्यांनी ओढलेला बुरखा,
प्रत्येक पावसाळ्यामध्ये फाटू लागतो.
पाऊस कधी मांडवली करत नाही,
पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो.

शेतकऱ्यांसाठी त्याने तारक व्हावे,
पावसाला दुष्टपणा कुठे शोभतो आहे ?
साऱ्या जगाचा सत्ताधारी असूनही,
हंगामी विरोधक म्हणून लाभतो आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8930
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
28मे 2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...