आजची वात्रटिका
-------------------
मुक्ताफळे
रोज नव नवे आरोप,
कानावरती आदळू लागले
ज्याला जे वाटेल ते,
मुक्ताफळे उधळू लागले.
त्यांनी उधळलेली मुक्ताफळे,
बेलगाम आणि स्वैर आहेत.
मुक्ताफळावरूनच कळते,
कोण किती सैरभैर आहेत?
राजकीय सैरभैरतेतच,
मुक्ताफळांचे उगम आहेत !
मुक्ताफळांचे अर्थ कळायलाही,
एकदमच सुगम आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8905
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 मे 2025

No comments:
Post a Comment