Friday, May 9, 2025

एकत्रीकरणाचे इशारे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

एकत्रीकरणाचे इशारे

जिकडून बघावे तिकडून,
मिलनाचे संकेत येऊ लागले.
अगदी उघड उघडपणे,
एकत्रीकरणाचे इशारे देऊ लागले.

इशाऱ्या इशाऱ्यामध्ये,
राजकीय भूकंपाचे धक्के आहेत.
राजकारणी ते राजकारणी,
सब घोडे बारा टक्के आहेत.

एकत्रीकरणाचा अभिमान वाटतो,
त्यामुळे कोणी वरमत नाही !
एक मात्र नक्की आहे,
सत्तेशिवाय कुणालाच करमत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8911
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 मे 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...