Wednesday, May 7, 2025

युद्धाचे वास्तव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------
युद्धाचे वास्तव
कुठे युद्धाचा ठराव आहे,
कुठे युद्धाचा सराव आहे.
फुगलेल्या बेडकाचे,
उगीच डराव डराव आहे.
युद्ध नको;युद्ध हवे,
सर्वांनीच जोर धरला आहे.
न्यूज चॅनलवाल्यांनी तर,
देशात युद्धज्वर पेरला आहे.
कुणाचे स्टेटस,कुणाची स्टोरी,
कुणाची पोस्टआणि रील आहे !
दुरून डोंगर साजरे,
असेच युद्धाचे थ्रील आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8909
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 मे 2025

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...