Saturday, May 10, 2025

नागरी युद्ध संहिता ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------


नागरी युद्ध संहिता

युद्धाच्या नको तशा फोटोंसोबत,
नको तसे व्हिडिओ रेटू लागले.
हौश्या नवशा आणि गौश्यांना,
युद्ध म्हणजे व्हिडिओ गेम वाटू लागले.

युद्ध म्हणजे उत्सव नसला तरी
कोण काय करील याचा नेम नाही.
त्या सोशल मीडियापटूंना सांगा,
युद्ध म्हणजे काही व्हिडिओ गेम नाही.

हल्ले चढवा;मनोधैर्य वाढवा,
मात्र उगाच असूरी हर्ष नको !
फेकाफेकी आणि टोकाटोकी सोबत,
नैराश्य आणि उन्मादाचा स्पर्श नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8912
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10 मे 2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...