Sunday, May 4, 2025

पक्षीय गोपाळकाला

आजची वात्रटिका
-------------------
पक्षीय गोपाळकाला
काही तिकडे गेल्यासारखे वाटतात,
काही इकडे आल्यासारखे वाटतात.
आजकाल सर्वच राजकीय पक्ष,
गोपाळकाला झाल्यासारखे वाटतात.
परस्परांचा गोपाळकाला बघून,
त्याचे कुणालाच काही वाटत नाही
पक्षांतर चुकीचे आहे हे बोलायला,
त्यामुळे कोणाचीही जीभ भेटत नाही.
आजचे पक्षीय सहकारी,
कालचेसुद्धा पक्षीय सहकारी आहेत !
सगळेच गोपाळकाल्याचे लाभार्थी,
एकमेकांपेक्षा जास्तच भारी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8906
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 मे 2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...