Wednesday, May 21, 2025

नेतृत्वाची ओळख....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

नेतृत्वाची ओळख

जात,धर्म आणि प्रवर्गानुसार
राजकारणी ओळखले जाऊ लागले.
सर्व समावेशक नेतृत्वाचे,
खोटे चेहरे खळकले जाऊ लागले.

जात,धर्म आणि प्रवर्गाच्या,
ओळखीचीही राजकीय नशा आहे.
नेतृत्वाच्या संकुचित ओळखीला,
सर्वत्र बेंडबाजा आणि ताशा आहे.

जात,धर्म आणि प्रवर्गातच,
कुणीही जखडून जाऊ नका !
सर्वव्यापी व्हा;सर्वसमावेशक व्हा,
छोटेपणातच आखडून जाऊ नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8923
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21मे 2025
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...