Monday, May 5, 2025

रुसवे फुगवे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

रुसवे फुगवे

जनतेला प्रश्न पडू लागला,
कोण कुणापेक्षा नागवे आहेत?
मित्रपक्ष कोणतेही असोत,
त्यांच्यामध्ये रुसवे फुगवे आहेत.

कुणी कुणी रुसत आहेत,
कुठेतरी जाऊन बसत आहेत.
परस्परांच्या रुसवा फुगविला,
तेच गालात हसत हसत आहेत.

उठता बसता रुसवा फुगवी आहे,
उठता बसता मनधरणी आहे !
विरोधकांचा नेहमीचा आरोप,
जैसी करणी वैसी भरणी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8907
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 मे 2025
 

No comments:

ऑपरेशन फोडाफोडी

आजची वात्रटिका ---------------------------- ऑपरेशन फोडाफोडी आज यांचे त्यांचे फुटले, उद्या दुसऱ्याची बारी आहे ऑपरेशन फोडाफोडी, सगळीकडूनच जारी...