आजची वात्रटिका
-------------------
जनगणनेचा कॉमन सेन्स
जो तो जातीनिहाय जनगणेकडे,
विकासाची नवी संधी म्हणून बघत आहे.
म्हणूनच जातीनिहाय जनगणनेचे,
संपूर्ण देशभरातून प्रचंड स्वागत आहे
आमचीही हीच मागणी होती,
असा अचानक अनेकांचा आव आहे.
कुणाकुणाच्या मनात शंका कुशंका,
कुणाला वाटते हा फसवा डाव आहे.
कुणासाठी मास्टर स्ट्रोक तर,
देशासाठी ऐतिहासिक ठरतो आहे !
जातीनिहाय जनगणनेचा निर्णय,
तरीही बिहार भोवती फिरतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8904
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 मे 2025

No comments:
Post a Comment