आजची वात्रटिका
-------------------
पक्षप्रवेशाचे सोहळे
यांचे त्यांच्याकडून ओढले जातात,
त्यांचे यांच्याकडून ओढले जातात.
सगळ्यांच्या पक्षप्रवेशाचे सोहळे,
अगदी असेच पार पडले जातात.
मित्र पक्षांच्या पक्षप्रवेशाची,
काही आगळीवेगळी मौज असते.
काल आपल्या विरुद्ध लढलेली,
मित्र पक्षातली नवी फौज असते.
सहन होत नाही;सांगताही येत नाही,
अशीच तर सगळ्यांची तऱ्हा आहे !
पक्षप्रवेशाचे पंचनामे त्यांचे ते करतील,
आपण तो न केलेलाच बरा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8908
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 मे 2025

No comments:
Post a Comment