मंत्रीपद
शिंक्याचे तुटले;बोक्याचे फावले,
असेच काहीसे झाले आहे.
ओबीसीचे काढून घेतलेले,
पुन्हा ओबीसीलाच दिले आहे.
पक्षामधली प्रतिमा सुद्धा,
पाचर हलवून मोठी झाली.
वहा नही रहना,जहा नही चैना,
ही डरकाळी मात्र खोटी झाली.
नेतृत्वाला मिळाली नवी झळाळी,
कार्यकर्त्यांसाठी टॉनिक आहे !
सत्तेच्या कुंभमेळ्यामध्ये,
अस्वस्थ मात्र झाकले माणिक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
साप्ताहिक सरकारनामा
24मे 2025

No comments:
Post a Comment