Monday, May 26, 2025

मान्सून घाई...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------

मान्सून घाई

अवकाळी पावसाच्या कहराने,
मान्सूनचे मान्सूनपण हरवले आहे.
निसर्गाने आपले ऋतुचक्र,
यंदा जरा जोरातच फिरवले आहे.

मान्सूनची भूमिका बजावत,
अवकाळीने हैदोस घातला आहे.
गोंधळलेल्या मृगाच्या किड्यांनीसुद्धा,
पेरते व्हा चा कानोसा घेतला आहे.

चक्रावून गेले हवामान तज्ञ,
बळीराजाचीही धांदल उडली आहे !
आखडलेला उन्हाळा बघून,
टँकर लॉबीनेही अशा सोडली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8928
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26मे 2025
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...