Thursday, May 8, 2025

ऑपरेशन सिंदूर चे अर्थ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------

ऑपरेशन सिंदूर चे अर्थ

एकीकडे पाकिस्तानच्या डोळ्यात,
झणझणीत असे अंजन आहे.
दुसरीकडे टीव्ही चॅनलच्या कृपेने,
युद्ध म्हणजे एक मनोरंजन आहे.

विरोधकांकडून सैनिकांचे,
इतरांकडून सरकारचे अभिनंदन आहे.
भारताच्या धैर्याला आणि शौर्याला,
संपूर्ण जगाकडून वंदन आहे.

चोर ते चोर वर पुन्हा शिरजोर,
पाकड्यांचे माकड चाळे व्यर्थ आहेत !
भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे,
ज्याचे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8910
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8 मे 2025
 

No comments:

पोलखोल....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पोलखोल समाजकारणातले राजकारण, हळूहळू उघडे पडायला लागले. ज्याला जिथे जिथे दडता येईल, ते तिथे तिथे ...