Thursday, June 18, 2020

वावड्यांचे पोस्टमार्टेम

वावड्यांचे पोस्टमार्टेम
लॉक डाऊन पाठोपाठ,
लोक अनलॉकच्याही
रेवड्या उडवू लागले.
जम्बो लॉकडाऊनच्या,
नव्या वावड्या उडवू लागले.
कोणत्याही वावाड्यांना,
खातरजमेचे वावडे असते !
वास्तवाचे भान राखतो कोण?
असत्य पूर्णपणे बेवडे असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7318
दैनिक झुंजार नेता
18जून2020
----------------------------
#कोरोना

पावसाची वृत्ती

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
-------------------------
पावसाची वृत्ती
पाऊस नेहनी मंगल करतो.
पाऊस कधी दंगल करतो.
वेधशाळेच्या अंदाजांची,
पाऊस नेहमी टिंगल करतो.
पाऊस रुजला जातो,
पाऊस पूजला जातो.
कित्येक किलोमीटर पडूनही,
पाऊस सेंमीत मोजला जातो
म्हणूनच पाऊस रूसतो,
कुठेतरी दडी मारून बसतो !
भरलेले आभाळही,
डोळ्यांदेखत मोकळे करून बसतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-3055
दैनिक पुण्यनगरी
18जून2012

ऑनलाईन दर्शन

आजची वात्रटिका
----------------------------
ऑनलाईन दर्शन
जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी ,
म्हणे तो दाही दिशानी आहे.
आता मोबाईल ऍपवारही,
त्याचीच तर निशाणी आहे.
जे लाईनमध्ये घ्यावे लागते,
ते दर्शन आता ऑनलाईन आहे !
नास्तिक म्हणाला अस्तिकाला,
ही 'ई युगाची' साईन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5832
दैनिक पुण्यनगरी
18जून2020
---------------------------
#कोरोना

Wednesday, June 17, 2020

खाट-खूट

आजची वात्रटिका
----------------------------
खाट-खूट
राऊतांच्या घोड्याची,
जरा जास्तच फुरफुर आहे.
काँग्रेसच्या जुन्या खाटेची,
म्हणे जास्तच कुरकुर आहे.
कुरकुरीपेक्षा 'खाट'खूटीचा,
जरा जास्तच गाजावाजा आहे !
अजाणतेपणाने काही घडू नये,
यासाठी पाठीशी
जुना-जाणता राजा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7317
दैनिक झुंजार नेता
17जून2020

खानदानी झोल

आजची वात्रटिका
----------------------------
खानदानी झोल
पॉलीवूडप्रमाणे बॉलीवूडमध्येही,
घराणेशाहीचा मोठा रोल आहे.
फादरच गॉडफादर असल्याने,
सिनेसृष्टीत खानदानी झोल आहे.
पॉलीवूड आणि बॉलिवूडमध्ये,
त्यामुळेच खानदानी मैत्री आहे !
आपल्या बाबूला घुसवून,
दुसऱ्या कार्ट्याला
सेन्सॉर अगोदरच कात्री आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5831
दैनिक पुण्यनगरी
17जून2020

Tuesday, June 16, 2020

सर सलामत तो...

आजची वात्रटिका
----------------------------
सर सलामत तो...
कोरोनाशी सामना करताना,
नवे बदल टाळतो आहोत.
जूनमध्येच शाळा सुरू व्हाव्यात,
ह्या अंधश्रद्धा पाळतो आहोत.
हे वर्ष शाळेशिवायही,
आपली परीक्षा बघण्याचे आहे !
शिक्षणाबरोबरच हे वर्ष,
फक्त आणि फक्त जगण्याचे आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7316
दैनिक झुंजार नेता
16जून2020
---------------------------

कोरोनाची शाळा

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाची शाळा
निसर्ग झाला शिक्षक,
आकाशाचा फळा आहे.
सक्तीचा गृहपाठ देणारी,
कोरोनाची शाळा आहे.
शाळाबंदी आणि बंदीशाळा,
कोरोनाच्याच खेळ्या आहेत !
निसर्ग शिक्षणातच,
सर्व शिक्षणाच्या मुळ्या आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5830
दैनिक पुण्यनगरी
16जून2020
---------------------------
#कोरोना

Monday, June 15, 2020

सुसाईड नोट



आजची वात्रटिका
----------------------------
सुसाईड नोट
रंकाची असो वा रावाची,
आत्महत्या ही आत्महत्या असते.
कमी-अधिक लक्ष वेधणे,
खरे तर हे वर्तनच मिथ्या असते.
जे विकते तेच पिकते,
जे विकत नाही,ते पिकत नाही !
कोणत्याही प्रश्नाचे उत्तर,
आत्महत्या असूच शकत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7316
दैनिक झुंजार नेता
15जून2020
---------------------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
----------------------------------------
https://suryakantdolase.blogspot.com
विशेष सूचना-माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी
-सूर्यकांत डोळसे

सरकारी पुरावा

आजची वात्रटिका
----------------------------
सरकारी पुरावा
विरोधी बाकावर बसणे,
कुणालाही मानवत नाही.
म्हणूनच विरोधकांना सरकारचे,
अस्तित्वच जाणवत नाही .
नेहमी नकाराचे भाव,
विरोधकांच्या नाकावर असतात !
कुणीतरी सत्तेवर आहे म्हणूनच,
ते विरोधी बाकावर असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5829
दैनिक पुण्यनगरी
15जून2020
---------------------------

Sunday, June 14, 2020

नाद खुळा

आजची वात्रटिका
----------------------------
नाद खुळा
बेशिस्त बोकाळली की,
कोरोना बोकाळू लागतो.
लोक चेकाळले की,
कोरोना चेकाळू लागतो.
लोकांच्या सादाला,
कोरोनाचा प्रतिसाद आहे !
ज्याचा नाद करायचा नाही,
त्याचाच लोकांकडून नाद आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7315
दैनिक झुंजार नेता
14जून2020
---------------------------
#कोरोना

हातच्या काकणाला.....

आजची वात्रटिका
----------------------------
हातच्या काकणाला.....
सत्तेत राहूनसुद्धा,
हात चोळीत बसावे लागते.
उपेक्षा सहन करीत,
आहे त्या ओळीत बसावे लागते.
नेत्यांपासून कार्यकर्त्यापर्यंत,
फरक कुठे फारसा आहे?
त्यांच्या हाताच्या काकणाला,
त्यांचाच तरआरसा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7312
दैनिक झुंजार नेता
12जून2020

निष्ठादर्शनाचे अनलॉक

आजची वात्रटिका
----------------------------
निष्ठादर्शनाचे अनलॉक
जसे जसे राजकीय नेते,
कोरोनाने बाधीत होऊ लागले.
निष्ठादर्शनाची नामी संधी म्हणून,
कार्यकर्ते त्याकडे पाहू लागले.
कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाचा
आपल्याला जरी शॉक आहे !
कार्यकर्त्यांसाठी मात्र,
निष्ठादर्शनाच्या लॉकडाऊनचे
हे आयते अनलॉक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5828
दैनिक पुण्यनगरी
14जून2020
---------------------------
#कोरोना

Saturday, June 13, 2020

शेजारधर्म

आजची वात्रटिका
----------------------------
शेजारधर्म
पाकचे शेपूट वाकडे,
त्याच मार्गाने चालला नेपाळ.
नकट्या चीनच्या समोर,
आपटून घ्यावे का कपाळ ?
आपले बिलंदर शेजारी,
हेच आपले कर्म आहे !
फक्त आपणच पाळावा लागतो,
तो शेजारधर्म आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7314
दैनिक झुंजार नेता
13जून2020

रिऍक्शन

आजची वात्रटिका
----------------------------
रिऍक्शन
कोरोना व्हायरस सांगू लागले,
आम्ही संधी साधून आलो.
जगातल्या अनेक राजकीय नेत्यांना,
आम्ही कोरोना बाधून आलो.
त्यांच्या या फुशारकीचे,
उलटच परिणाम झाले आहेत !
इतर कोरोना व्हायरसकडून,
ते कायमचे क्वारंटाईन केले आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5827
दैनिक पुण्यनगरी
13जून2020
---------------------------
---
#कोरोना

Friday, June 12, 2020

कोरोनाचा संवाद

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाचा संवाद
सोशल डिस्टनसिंगच्या नाटकाला,
उगीच कुणी चुकूनही भुलू नका.
रस्त्या-रस्त्यावरच्या खड्डयांमध्ये,
आपली इज्जत काही घालू नका.
पावसाळा म्हणजे सुवर्णसंधी,
आता तर आपली चांदी आहे !!
अनलॉकचे पितळ उघडे पडले,
ही आपल्या यशाची नांदी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5826
दैनिक पुण्यनगरी
12जून2020
---------------------------
---
#कोरोना

Thursday, June 11, 2020

डेअरींगचे बेअरिंग


दोस्ती आणि मस्ती

आजची वात्रटिका
----------------------------
दोस्ती आणि मस्ती
कोरोनाशी दोस्ती सोडून,
कोरोनाशी मस्ती आहे.
तीही जेंव्हा जिकडे तिकडे,
कोरोनाचीच वस्ती आहे.
दोस्तीपेक्षा मस्तीच,
कितीतरी पट जास्ती आहे !
लोक सिद्ध करु लागले,
जिंदगी खूप सस्ती आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5825
दैनिक पुण्यनगरी
11जून2020
---------------------------
---
#कोरोना

Wednesday, June 10, 2020

अनलॉक दर्शन

आजची वात्रटिका
----------------------------
अनलॉक दर्शन
लोक उतायला लागले,
लोक मातायला लागले.
लोकांचे सैराटपण,
जीवावर बेतायला लागले.
मास्क न घालताच,
नाक उचलून बोलू लागले.
सोशल डिस्टनसिंगला,
रस्त्यावर कोलू लागले.
एवढे धडे शिकलो तरी,
कोरोना साक्षर झालो नाही !
कोरोना स्फोटकपणे सांगेल,
मी गेलो आणि मेलो नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7310
दैनिक झुंजार नेता
10जून2020
---------------------------
---
#कोरोना

कोरोनात्रस्त

आजची वात्रटिका
---------------------------------
कोरोनात्रस्त
कोरोनाच्या संबंधात
रोज नवे वृत्त कळू लागले.
पूर्वी फक्त पेशंट पळायचे,
आता तर मृतदेह पळू लागले.
वृत्त दुर्दैवी असले तरी,
हे बरेच काही सूचक आहे !
जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही,
जणू कोरोनाचा वचक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5824
दैनिक पुण्यनगरी
10जून2020
-------------------------------

Tuesday, June 9, 2020

दैव-गती

आजची वात्रटिका
---------------------------------
दैव-गती
देव गेले कुठे सांगा रे ?
भक्तांची परस्परांशी हुज्जत आहे.
कोरोनाच्या साथीमुळे,
धोक्यात आपली इज्जत आहे.
जागृत असणारे देवसुद्धा,
कोरोनापुढे हतबल ठरले आहेत?
देवांचे अवतार बघून वाटते,
त्यांचेही ग्रह फिरले आहेत!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7309
दैनिक झुंजार नेता
9जून2020
-------------------------------

कोरोना पॅटर्न

आजची वात्रटिका
---------------------------------
कोरोना पॅटर्न
कॉपीमुक्त परीक्षेची पॅटर्न,
कुठे यशस्वी,कुठे फेल आहे.
ज्याची मागणी जास्त असते,
त्याचाच इथे जोरात सेल आहे.
परीक्षामुक्त शिक्षणाचा,
कोरोनाने पाया घातला आहे !
आत्तापर्यंत आपण कॉपीमुक्तीत
उगीच वेळ वाया घातला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-5823
दैनिक पुण्यनगरी
9जून2020
---------------------------
#कोरोना

Monday, June 8, 2020

हम होंगे कामियाब

आजची वात्रटिका
---------------------------------
हम होंगे कामियाब
नकट्या चीनच्या मनमानीला
आपण नक्की रोखू शकतो.
एकट्या महाराष्ट्राने सिद्ध केले,
आपण चीनला मागे टाकू शकतो.
ज्यात चीनला मागे टाकले,
तो कोरोनाग्रस्तांचा आकडा आहे !
आत्मनिर्भर भारत,
हा आपला उद्याचा मुखडा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7308
दैनिक झुंजार नेता
8जून2020

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...