आजची वात्रटिका
-------------------------
सामाजिक प्रदूषण
जो तो आपल्याच तोऱ्यात,
जो तो आपल्याच खुशीत आहे.
सामाजिक वातावरण मात्र,
आज नको तेवढे प्रदूषित आहे.
ज्याच्या त्याच्या पाठीराख्यांनी,
ज्याचा त्याचा मार्ग धरला आहे.
वाढत्या प्रदूषणाने मात्र,
सामाजिक श्वास गुदमरला आहे.
ते करतात घसे मोकळे,
इतरांची मात्र मुस्कटदाबी आहे !
समाजकारणाच्या माध्यमातून,
राजकीय समस्या उभी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8405
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
28नोव्हेंबर2023
No comments:
Post a Comment