आजची वात्रटिका
-------------------------
तेंडुलकर आणि कोहली
हिमालय आणि माउंट एव्हरेस्टची,
जशी तुलाच होऊ शकत नाही.
तशी एकमेकांशिवाय दोघांचीही,
खरी उंची लक्षात येऊ शकत नाही.
विक्रम हे मोडण्यासाठीच असतात,
काळाच्या पटलावरती,
काळाचीच टिपणं आहेत !
भारतीय क्रिकेटला पडलेली,
ही जित्ती जागती स्वप्नं आहेत !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8392
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
7नोव्हेंबर2023
No comments:
Post a Comment