Wednesday, November 1, 2023

भांडवली उद्योग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
भांडवली उद्योग
जसे एखाद्याला हिरो केले की,
कुणाला तरी व्हीलन ठरवावे लागते.
तसे प्रेक्षकांच्या आवडीनुसार,
चित्रपटालाही खाद्य पुरवावे लागते.
लाइटिंग आणि फायटिंग सोबर
आयटम सॉंग्जचा डान्स असतो.
ज्याचे असते खरे भाग भांडवल,
त्यालाच खरा चान्स असतो.
कथा एकाची, पटकथाकार दुसरा,
संवाद लेखकही तिसरा असतो !
सगळे जमून आले तरी,
खरा फायनान्सरचा आसरा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिकवात्रटिका
वर्ष -3रे
1 नोव्हेंबर2023

No comments:

धडाकेबाज पुनरागमन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- धडाकेबाज पुनरागमन मी पुन्हा येईन म्हणणारे, आक्रमक होऊन आले आहेत. साधेसुधे नाहीत तर, स्पष्ट बहुमत घ...