Monday, November 27, 2023

नवा चिनी व्हायरस....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नवा चिनी व्हायरस

जागतिक घाबरगुंडीला,
कोरोनाचा आयना आहे.
पुन्हा एकदा नवा व्हायरस,
मेड इन चायना आहे.

मेड इन चायनाचा संसर्ग,
साऱ्या जगाला होतो आहे.
चीनने पुनर्विचार करावा,
आपण काय काय खातो आहे?

नव्या व्हायरसचे टार्गेट,
चीनमधले आबाल-वृद्ध आहेत !
हिंसा आणि अहिंसेचे पुजारी,
चीनपुढे तर हतबुद्ध आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8404
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27नोव्हेंबर2023
 

No comments:

धडाकेबाज पुनरागमन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- धडाकेबाज पुनरागमन मी पुन्हा येईन म्हणणारे, आक्रमक होऊन आले आहेत. साधेसुधे नाहीत तर, स्पष्ट बहुमत घ...