Tuesday, November 14, 2023

बंडखोरीचे बीज....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बंडखोरीचे बीज

एकदा बंडखोरी पेरली की,
पुन्हा बंडखोरीच उगवत असते.
नव्या बंडाची आस,
जुनी बंडखोरीच जागवत असते.

बंडखोर समर्थकांना वाटू शकते,
ह्या तर निव्वळ फुणग्या आहेत!
बंडखोरांच्या छावण्या बघा,
तिचे बंडखोरीच्याच ठिणग्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
14नोव्हेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका8मे2024....वर्ष- तिसरे..अंक -336वा

दैनिक वात्रटिका 8मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -336वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1XewNOM-fFB8BoGskcn2d3Hm3EQ...