आजची वात्रटिका
-------------------------
डिजिटल सम्राट
प्रत्येकाच्या भावनांचे प्रतिबिंब,
डिजिटल बॅनरवरती पडू लागले.
बघता बघता आपल्या देशामध्ये,
नवे हिंदुहृदय सम्राट वाढू लागले.
सेनापती तर आधीच अति आहेत,
त्यात हिंदुहृदय सम्राटांची भर आहे.
एकमेकांच्या भावनांची,
विरोधकांकडून जाहीर टर आहे.
ज्याची ज्याची कॉपी मारावी वाटेल,
त्याची त्याची कॉपी मारायला लागले !
कपड्यावरून आणि रुपड्यावरून,
नवे भ्रम निर्माण करायला लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8402
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
25नोव्हेंबर2023
No comments:
Post a Comment