Wednesday, November 29, 2023

दंगलीचे अंदाज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

दंगलीचे अंदाज

आपल्या देशाचे राजकारण,
कोणत्या थराला जायला लागले?
हवामानाच्या अंदाजयासारखे,
दंगलीचेही अंदाज यायला लागले.

जसे दंगलतज्ञ आगळे वेगळे,
त्यांचे अंदाजही आगळे आहेत.
दंगलीचे अंदाज सांगणारे,
दंगलतज्ञसुद्धा वेगवेगळे आहेत.

बदलत्या राजकीय वादळ-वाऱ्यावर,
दंगलींची दशा आणि दिशा आहे !
पावसाप्रमाणे हेही अंदाज चुकावेत,
अशी मात्र आमची वेडी आशा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8406
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29नोव्हेंबर2023
 

No comments:

daily vatratika...29jane2026