आजची वात्रटिका
-------------------------
राजकीय आजारपण
राजकीय नेत्यांच्या आजाराने,
कार्यकर्ते बेजार आहेत.
अत्यंत अनाकलनीय असे,
नेत्या-नेत्यांचे आजार आहेत.
नेत्यांच्या आजारपणाचा,
प्रकार पुन्हा पुन्हा घडतो आहे.
जो तो आपाआपल्या सोयीने,
पाहिजे तेव्हा आजारी पडतो आहे.
प्रत्येकाच्या राजकीय आजाराचे,
अगदीच वेगवेगळे लक्षण आहे !
वादावादी पासून दूर कसे राहावे?
आजारपणातून शिक्षण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
11नोव्हेंबर2023
No comments:
Post a Comment