Sunday, November 26, 2023

आम्ही भारताचे लोक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
-------------------------

आम्ही भारताचे लोक...

संविधान जपण्याच्या अडचणी,
आज संविधानिक देशात आहेत.
आजकाल संविधान विरोधकच,
संविधान पूजकाच्या वेशात आहेत.

संविधानिक मार्गानेच संविधानाची,
पार पंचायत करून टाकली आहे.
सामान्य जनता गोंधळून गेलीय,
कोण असली?कोण नकली आहे?

स्वतःचा गोंधळ,स्वतःच मिटवा,
आपण पूजक की विरोधक आहोत ?
पुन्हा पुन्हा दाखवून देऊ,
आम्हीच भारताचे खरे लोक आहोत !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8403
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26नोव्हेंबर2023

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...