Thursday, November 9, 2023

राजकीय सत्य....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

राजकीय सत्य

कधी राजकारण पेटले जाते,
कधी राजकारणासाठी पेटवले जाते.
ज्याला जसे जसे उठवता येईल,
तसे तसे रानसुद्धा उठवले जाते.

जो राजकारणासाठी टपलेला
त्याला आयते भांडवल पुरवून जातो !
सत्याचा खरा चेहरासुद्धा,
राजकारणात सहज हरवून जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8392
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
9नोव्हेंबर2023
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...