Thursday, November 30, 2023

संकटमोचक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

संकटमोचक

संकटातून वाचवतो एक,
श्रेय मात्र दुसऱ्याला दिले जाते.
जो वाचला संकटातून,
त्याच्याकडून हेच केले जाते.

आमचे हे विधान जेवढे सत्य,
त्याच्यापेक्षाही ते खोचक आहे.
ज्याचे त्यालाच कळत नाही,
आपला कोण संकटमोचक आहे?

चमत्कार चमत्कार म्हणीत,
सगळे बुचकळ्यात पडले जातात !
नास्तिक आणि अस्तिकाकडूनही
हात दुसरीकडेच जोडले जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8407
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
30नोव्हेंबर2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 309 वा l पाने -57

आजचा अंक दैनिक वात्रटिका l 8 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 309 वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1Xo0K3gNi...