Saturday, November 11, 2023

स्वार्थकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------
स्वार्थकारण
काल ज्यांचे खांद्याला खांदे होते,
आज त्यांचेच वांधे एके वांधे आहेत.
स्पष्ट सांगायचे झाले तर,
सगळेच उलटे सुलटे धंदे आहेत.
काल सरळ सरळ चालणारा,
आज अचानक अडवा येतो.
एकदा स्वार्थ आडवा आला की,
सरळ माणूसही कडवा होतो.
स्वार्थ कुठलाही असो,
त्याला संघर्षाचा नाद आहे !
यातून निष्कर्ष हाच की,
स्वार्थकारण जिंदाबाद आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष -3 रे
11नोव्हेंबर2023

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...