आजची वात्रटिका
--------------------
ऑपरेशन तुडवा
जाणारा म्हणतो मी कडवा आहे,
राहिलेला म्हणतो मीच कडवा आहे.
ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून,
आता म्हणे ऑपरेशन तुडवा आहे.
कधी अडवले गेले;कधी तुडवले गेले,
तरी वेळोवेळी ऑपरेशन घडवले गेले.
गद्दार आणि महागद्दार म्हणीत,
शहाण्याला शब्दांनीही बडवले गेले.
उडाले ते कावळे;राहिले ते मावळे,
नवी मशाल पुन्हा धगधगते आहे !
धनुष्य म्हणाले बाणाला,
जग फक्त पैशावरती जगते आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9312
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 जून 2026












