आजची वात्रटिका
--------------------
स्वार्थ रक्षण
सरळ चालण्याची अपेक्षा असणारा,
आता वाकडी वाट धरू लागला.
ज्याला बसविले डोक्यावरती,
तोच कानाची चौकशी करू लागला.
कानामागून येऊन सुद्धा,
जास्तच तिखटपणा दाखवू लागला.
एकाला सुखावण्याच्या नादात,
इतरांना पुन्हा पुन्हा दुखवू लागला.
ज्याची त्याची पक्की खात्री झाली,
हे तर हात दाखवून अवलक्षण आहे !
उपकाराची भाषा बोलताना,
फक्त आपल्याच स्वार्थाचे रक्षण आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9362
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8ऑगस्ट 2026
----------------------------














