Showing posts with label इज्जत का सवाल... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label इज्जत का सवाल... मराठी वात्रटिका. Show all posts

Wednesday, December 7, 2022

इज्जत का सवाल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------

इज्जत का सवाल

कुणी किती लाच खावी?
हा इज्जतीचा सवाल आहे.
कुणाला किती गोड लागते?
हा लज्जतीचा सवाल आहे.

आपल्या लायकी प्रमाणे तरी,
खाणाराणने लाच खायला हवी!
लाच देणाऱ्यानेसुद्धा,
लायकीप्रमाणे लाच द्यायला हवी !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-8117
दैनिक झुंजार नेता
7डिसेंबर2022

 

Saturday, December 25, 2021

इज्जत का सवाल... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------
इज्जत का सवाल
कुणी करतोय मिमिक्री,
कुणाचा एकपात्री खेळ आहे.
विधानभवनाच्या पटलावर,
उघड्या तमाशाची वेळ आहे.
कुणाला वाटते किळस,
कुणाला यातच लज्जत आहे !
आपल्याच हातामध्ये,
आपलीच इज्जत आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7797
दैनिक झुंजार नेता
25डिसेंबर2021

 

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...